नवी मुंबई (Pclive7.com):- नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी आज नवी मुंबई महापालिकेतील महापौर दालनात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

या सत्कारप्रसंगी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांचे समवेत नवी मुंबई महापालिकेतील कर्मचारी तसेच संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचीही भेट घेण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच आयुक्त यांच्या समवेत बैठक घेऊन हे प्रश्न सर्वसाधारण सभेसमोर मांडण्यात येतील, असे आश्वासन महापौर सौ. सुजाताताई पाटील व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी यशवंतभाऊ भोसले यांना दिले. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन सकारात्मक असून, यासाठी संयुक्त प्रयत्न केले जातील, असा विश्वास राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केला.





















Join Our Whatsapp Group