पिंपरी (Pclive7.com):- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. या उच्चांकी दरवाढीच्या निषेधार्थ सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहेत. काल पेट्रोलचा दर ८७ तर डिझेल ७५ रूपयांवर पोहचला आहे.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील भाजप सरकारच्या निषेधार्थ चिंचवड स्टेशन पासून चापेकर चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विशाल काळभोर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विजय लोखंडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group