पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील ३९ वर्षीय तरूणाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस शहरात स्वाईन फ्लूच्या रूग्णांची वाढ होत असून यावर्षात बळींचा आकडा १४ वर पोहचला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत तरूणाला दि.३ सप्टेंबर रोजी पिंपरीतील येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान आज त्या तरूणाचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या १४ वर पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांत पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन शहरवासियांना करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group