पिंपरी (Pclive7.com):- शहरात दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात देखील शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शुक्रवार, दिनांक ०७ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या बैठकीस आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, खासदार अमर साबळे यांची विशेष उपस्थिती व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, विरोधी पक्षनेता दत्तात्रय साने, आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहा. पोलिस आयुक्त सतीश पाटील, श्रीधर जाधव, चंद्रकांत अलसटवार, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुध्रारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती संजय नेवाळे, शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेता राहुल कलाटे, मनसे, गटनेता सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेता कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य संतोष लोंढे, ऍड. नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत.
यावर्षी होणारा पर्यावरण पूरक गणेशोत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शांतता बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.





















Join Our Whatsapp Group