पुणे (Pclive7.com):- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला यंदा १२६ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एका भाविकाने तब्बल १२६ किलो माव्याचा मोदक बाप्पाला अर्पण करण्यासाठी बनवून घेतल्याचे समोर आले आहे. काका हलवाईचे युवराज गाडवे यांनी हा मोदक साकारला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा तामिळनाडू राज्यातील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मोदकासह मिठाई आणि नमकीन पदार्थांचा नैवेद्द आज (शुक्रवारी) दाखविण्यात येणार आहे. माव्याच्या या मोदकावर काजू, बेदाणे आणि बदामाची कलाकुसर केलेली आहे. सध्या हा मोदक बुधवार पेठेतील ‘काका हलवाई’ दुकानात ठेवण्यात आला असून हा मोदक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.






















Join Our Whatsapp Group