पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या चर्चेत दरम्यान सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि नगरसेविका सीमा सावळे या दोन सदस्यांमधील वाद टोकाला गेल्याने अखेर २७ सप्टेंबर प्रयत्न सभा तहकूब करण्यात आली. आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.
महापालिका प्रशासनावर सत्ताधारी पक्षाचा वचक राहिला नाही, शहरातील मोकाट कुत्री पकडली जात नाहीत, जी पकडली जातात ती मोशी परिसरात सोडतात परत ती आजू बाजूच्या परिसरात येतात, याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क आज सभागृहात कुत्रे घेऊन येण्याचा प्रयत्न केला. मात्र विनंती नंतर प्रकार थांबला. यानंतर सभागृहात यावर जोरदार चर्चा झाली. यावरून सभागृहात चांगलाच वादंग पेटला, त्यामुळे महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर सभा तहकूब करण्याचा ठराव सभागृह नेते एकनाथ पवार यांनी मांडला. त्यानंतर महापौर जाधव यांनी २७ तारखे प्रयत्न सभा तहकूब केली.






















Join Our Whatsapp Group