पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील अभिषेक दाणी या तरूणाने घरीच्या गणपती बाप्पा समोर अतिशय सुंदर सजावट करण्यात आली आहे. निगडीतील भक्ती शक्ती चौकात तयार होणाऱ्या उड्डाणपूलाची हुबेहूब प्रतिकृती केली आहे. ही सजावट संपूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून केली आहे. विशेष म्हणजे बाप्पाची मुर्ती देखील शाडू मातीने बनवलेली आहे.
आकुर्डी येथील कीर्ती कूपर सोसायटी, सेक्टर नंबर २८, ब्लॉक नंबर २७, येथे दाणी कुटूंबिय राहतात. गेल्या कित्तेक वर्षापासून परंपरेनुसार गणपती बाप्पा या कुटूंबियांच्या घरी विराजमान होतात. याच कुटूंबातील अभिषेक दाणी हे दरवर्षी बाप्पासमोर वेगवेगळी सुंदर सजावट करतात. यंदाच्या वर्षी देखील त्यांनी भक्ती शक्ती उड्डाणपूलाची प्रतिकृती बनवली आहे. जुन्या बॉक्सचे पुठ्ठे, वर्तमान पत्र, चित्रकलेचा कागद, आणि रंग यापासून अतिशय सुंदर असा देखावा केला आहे. विशेष म्हणजे या सर्व सजावटीचे सर्व रंगकाम ५ वर्षाच्या आभास या चिमुकल्याने केले आहे. अभिषेक यांनी केलेली ही सजावट आणि बाप्पा पाहण्यासाठी नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक आवर्जून येत आहेत. अभिषेक यांनी पर्यावरणपूरक पध्दतीने केलेल्या या सजावटीचे सर्वजण कौतुक करत आहेत.






















Join Our Whatsapp Group