पिंपरी (Pclive7.com):- पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्तीदान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे. यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यात रहाटणी,.पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक असे एकूण १२ हजार ३०० मूर्ती दान करण्यात आल्या.
गेल्यावर्षी या उपक्रमात साडेतीन हजाराहून अधिक गणेशमूर्ती दान करण्यात आल्या होत्या. या मूर्ती श्री फाउंडेशन, पुणे यांना देण्यात आल्या त्या मुर्त्यांची नव्याने रंगरंगोटी करून विक्री करण्यात आली. त्यामधून ३ ते ४ लाख रुपये निधी गोळा झाला. या निधीचा वापर अनाथ आश्रमातील मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच यावर्षीही १२ ते १३ हजार मूर्ती या उपक्रमातून जमा करण्यात आल्या आहेत. यामधून मिळणाऱ्या निधीचा उपयोग गरजू व अनाथ मुलांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी करण्यात येणार आहे.
या उपक्रमात नगरसेवक नाना काटे स्वतः विसर्जन घाटावर उपस्तीत राहून आवाहन करत होते त्याबरोबर नाना काटे सोशल फाउंडेशन, विविध संस्था, एमकेअर फार्मा कंपनी, रोटरी क्लब आदी, संस्थाच्या स्वयंसेवकांनी भाविकाना मूर्तीदान व निर्माल्य कलशात टाकण्याचे आव्हान करण्यात येत होते.





















Join Our Whatsapp Group