पिंपरी (Pclive7.com):- रिक्षा-टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी या संघटनांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान कार्यालयात केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी देशभरातील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रिक्षा-टॅक्सी संघटनांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन दिले.
या बैठकीत रिक्षा विमा हप्त्यामधील (इन्शोरन्स) वाढ, रिक्षा चालकांची सामाजिक सुरक्षा, रेल्वे स्टेशनवरील रिक्षा-टॅक्सी चालकांची जागेचा प्रश्न, ओला-उबरमुळे रिक्षा व्यवसायिकांना सोसावा लागत असलेला तोटा, ई-रिक्षा यांसह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस बाबा कांबळे, भारतीय मजदूर संघाचे राजेंद्र सोनी, जम्मू काश्मीर रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अचल सिंग, अखिल मोटर ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष मधुकर थोरात, नवी मुंबई कृती समितीने नेते मारुती कोंडे, सुनील बोर्डे आदी पदाधिकारी या बैठकिला उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group