पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात ‘स्वाईन फ्लू’ बाधित दोन रुग्णांचा गुरुवारी (दि.२७) उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
‘स्वाईन फ्लू’ने गुरुवारी संत तुकारामनगर येथील ५३ वर्षीय पुरुष तर मोराची चिंचोली येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गुरूवारी पाच बाधित रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांचा आकडा १८५ वर गेला आहे. या आजाराने मृत्यूंची संख्या झपाट्याने वाढत असून जानेवारीपासून अद्यापपर्यत २६ रुग्ण दगावले आहेत.
हा आजार अचानक फैलावल्यानंतर गेल्या तीन महिन्यात २५ रुग्णांचा मृत्यू झाला. या भयावह आकडेवारीने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच, सद्यस्थितीला ४५ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आलेले आहेत. ‘स्वाईन फ्लू’चे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. तसेच, नागरिकांनीही या आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात दाखवावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.






















Join Our Whatsapp Group