पिंपरी (Pclive7.com):- महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागरमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नवचैतन्य हास्यक्लब, लायन्स क्लब आणि नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

आज सकाळी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन पिंपळे सौदागर येथील लिनीअर अर्बन गार्डन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, हास्यक्लब व लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांनी परिसरातील स्वच्छता केली.





















Join Our Whatsapp Group