नवी दिल्ली (Pclive7.com):- पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ अद्यापही थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आलेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरात २३ पैशांची वाढ झाली असून पेट्रोल ८७.७३ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेलच्या दरात ३१ पैशांची वाढ होऊन डिझेल ७७.६८ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
दिल्लीमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये दररोज चढउतार झालेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात २३ पैशांची वाढ होऊन ८२.२६ रुपये प्रतिलिटर, तर डिझेलमध्ये २९ पैशांची वाढ होऊन ७४.११ रुपये प्रतिलिटर झाले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोलच्या दरात ५ आणि डिझेलच्या दरात ४ रुपये ६ पैशांची घट झाली होती. यामुळे जनतेला दिलासा मिळतो न मिळतो तोच पुन्हा एकदा दरवाढीस सुरुवात झाली. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे






















Join Our Whatsapp Group