पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यावर कारवाईसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर मंगळवारी (दि.९) ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ढोल वाजवून महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा यावेळी निषेध करण्यात आला.
पंतप्रधान आवास योजनेच्या कामाचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने महापालिकेचे १५० कोटींचे आर्थिक नुकसान होणार आहे. हा अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार करणारे सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी आणि सल्लागार शशांक फडके यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळोवेळ निवेदन देऊनही त्यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय पिंपरी कॅम्पातील शगुन चौकात मे.केसवानी बिल्डर्सचे अनधिकृत बांधकाम सुरु आहे. तसेच पिंपरीतील महापालिकेच्या जागेवर रयत शिक्षण संस्थेकडून अतिक्रमण करुन बांधकाम सुरु आहे. त या सर्व बाबींचा पाठपुरावा करुनही महापालिका आयुक्तांकडून त्याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनापर्यंत हा निषेध पोचविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जाणीव फौंडेशनचे अमर कापसे, सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे, जया पाटील, माणिक सोनवणे, विशाल मोटे आदी सहभागी झाले होते.






















Join Our Whatsapp Group