पिंपरी (Pclive7.com):- दिव्यांग नागरिकांच्या अधिकृत स्टॉलवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याचा आरोप करत दिव्यांग नागरिकांनी आज (सोमवारी) महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. अधिकृत स्टॉलवर कारवाई करणा-या अतिक्रमण निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी आहे.
महापालिकेसमोर सकाळपासून दिव्यांगाचे आंदोलन सुरु आहे. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रफिक खान, लॉरेन रिस्लुवा, संगीता जोशी, लता गु-हाटे, ज्ञानदेव नारकडे आंदोलनात सहभागी आहेत.
राजेंद्र वाकचौरे म्हणाले, निगडीतील भक्ती-शक्ती चौकात दिव्यांग नागरिकांचे अधिकृत स्टॉल आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने २५ सप्टेंबर रोजी स्टॉलवर कारवाई केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालिकेकडून उल्लंघन झाले आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या अधिका-यावर कारवाई करण्यात यावी. तसेच स्टॉलचे पुनर्वसन का केले नाही, याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करत आहोत.






















Join Our Whatsapp Group