पिंपरी (Pclive7.com):- भोसरी एमआयडीसी आणि मावळ पोलीसांच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १६०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. संगमनेर येथून मुंबईकडे गोमांस घेऊन विक्रीसाठी निघालेल्या दोन ईटॉस कार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांच्या मदतीने पकडल्या. रविवारी दि.१४ रोजी ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर येथून मुंबईकडे गोमांस विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. स्वामी व त्यांचे सहकारी, मंगेश नढे, उपेंद्र बलकवडे, शरद कोतकर, हर्षद पारखे, अमोल पगडे, गणेश रौदल यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशन व भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन्ही कार पोलिसांच्या मदतीने थांबविल्या. सदर कार चालकांकडे पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्य गोमांस असल्याचे सांगितले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन सर्व मांस निष्कासित करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे अर्जुन बोराटे, योगेश सासवडे, कुणाल साठे, नितीन वटकर, नाना सावंत, अभिजित शिंदे, अभिजित चव्हाण, शिवांकुर खेर तसेच ५० ते ६० गोरक्षकांनी याकारवाईत सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group