पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील गणेशम फेज २ सोसायटी येथे रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधत शारदीय उत्सवात आगळा वेगळ्या महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीमधील सर्व वयोगटातील महिलांनी उत्साहाने भोंडल्याची गाणी गात भोंडला सादर केला. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या हस्ते महाआरती करून भोंडल्याच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रश्नमंजुषेसह विविध पारंपारिक खेळ झाले.
या कार्यक्रमात सोसायटीमधील सर्व स्त्रियांनी उत्सहात सहभाग घेतला होता. आज पिंपळे सौदागरला आयटी हब म्हणून ओळखल जाते. येथील उच्चशिक्षित महिलांनी भोंडल्या सारख्या पारंपारिक खेळाचे आयोजन करून पिंपळे सौदागरकरांनी एक आपले वेगळेपण जपले आहे. यावेळी नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या, भारतीय संस्कृतीची व सणाची नव्या पिढीला ओळख व्हावी, तसेच आपले पारंपारिक सण साजरे करत असताना खेळल्या जाणाऱ्या पारंपारिक माहिती व्हावी यासाठी गणेशम फेज २ या सोसायटीतील महिलांनी पुढाकार घेत महाभोंडला आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे आभारही मानले तसेच या पुढे असेच आपली भारतीय संस्कृती जतन करणारे असे पारंपारिक कार्यक्रम व खेळ इतर ठिकाणीही घ्यावे असे सांगण्यात आले.






















Join Our Whatsapp Group