पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घरोघरी कचरा गोळा करण्याकरिता निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये बीव्हीजी कंपनी व ए.जी. इनव्हायरो इन्फ्रा कंपनीने टेंडर भरले होते. १७४० रूपये व १७८० रूपये प्रती टनास जास्त रेट असल्याने सामाजिक संघटना व राजकीय पुढाऱ्यांनी विरोध केल्यामुळे व कोर्टात केस टाकल्याने हि निविदा रद्द करण्यात आली होती. निविदा रद्द केल्यानंतर दोन्ही ठेकेदारांनी स्थायी समितीस पत्र देवून प्रती. टनास २१० रुपये प्रती टनास कमी करतो, असे पत्र देण्यात आले होते. निविदा प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांना पुन्हा ठेका देणे म्हणजे या प्रकरणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा संशय येत आहे. दोन्ही ठेकेदारास थेट पद्धतीने ठेका देण्यात आला आहे, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघेरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नवीन निविदा काढल्यानंतर २२ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यामुळेच या दोन ठेकेदारांनी २१० रूपये प्रती टन कमी केले आहे. त्यामुळे महापालिकेचे ८४ कोटी ५१ लाख रुपये वाचणार आहेत. फेर निविदा काढल्यानंतर २२ ठेकेदार यापेक्षा ही कमी दर देवू शकतात. त्यामुळे महापालिरेचे व करदात्यांचे पैसे वाचणार आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करून पुन्हा फेरनिविदा काढावी, अन्यथा आयुक्तांविरोधात कोर्टात जावे लागेल. इशारा रमेश वाघेरे यांनी दिला आहे.






















Join Our Whatsapp Group