पिंपरी (Pclive7.com):- पुण्यात होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना ताजी असताना आता चिंचवडमध्ये ट्रॉफिक सिग्नलचा खांबच रस्त्यावर कोसळला आहे. चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकात ही घटना घडली आहे. आज पहाटे घडलेल्या या घटनेमुळे सुदैवाने यात कोणतेही हानी झाली नाही.
चिंचवड स्टेशन चौकात कायमच वर्दळ असते. आज पहाटे येथील महावीर चौकात उभा असलेला ट्राफिक सिग्नलचा खांब अचानकपणे रस्त्यावर कोसळला. पहाटेची वेळ असल्याने सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान येथील नागरिकांनी महापलिकेला कळवून एकही अधिकारी अद्याप घटनास्थळी आलेला नाही. तसेच कोसळलेला हा खांब रस्त्यावर तसाच पडून आहे.





















Join Our Whatsapp Group