पिंपरी (Pclive7.com):- रावेत पंपिंग स्टेशनचा आज (बुधवारी) सकाळी पावणेसहा ते सात वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे सकाळी होणारा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातून पवना नदीपत्रात पाणी सोडले जाते. रावेत बंधाऱ्यातून महापालिका पाणी उचलते. आज सकाळी रावेत पंपिंग स्टेशनचा सुमारे एक तास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाणी उचलता आले नाही. त्यामुळे सकाळी होणारा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा झाला आहे. त्यामुळे नागरिकांचा मनस्ताप झाला.





















Join Our Whatsapp Group