पिंपरी (Pclive7.com):- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रभाग क्रमांक २ चिखली येथे घंटागाडी सुरु करण्यात आली. या घंटागाडीचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
समाजसेविका सोनम रवी जांभुळकर व जागृती महिला प्रतिष्ठानच्यावचीने प्रभागात कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही घंटागाडी सुरु करण्यात आली. यावेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव, नगरसेविका सारीका बोऱ्हाडे, नितीन बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. सोनम रवी जांभुळकर यांच्या या समाजकार्यातून महिलांना मोठे सहकार्य मिळत आहे. महिला प्रतिष्ठानच्या माध्यमांतून असेच समाजपयोगी उपक्रम राबवित असून महिलांमधून त्यांचे कौतुक होत आहे. घंटागाडी सुरुवातीला होती पण वेळेवर येत नव्हती. त्यासाठी महापौर राहूल जाधव व सोनम रवी जांभुळकर यांच्या पाठपुराव्याने ही घंटागाडी सुरु झाली आहे.






















Join Our Whatsapp Group