थेरगाव (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांच्या आजी श्रीमती नानाबाई गोपाळ बारणे (वय ८७) यांचे गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात बारणे परिवाराचा मोठा आप्तपरिवार आहे.

श्रीमती नानाबाई बारणे या अत्यंत सुस्वभावी आणि प्रेमळ होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच थेरगाव परिसरात शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बारणे परिवाराचे सांत्वन केले आहे.

स्व. श्रीमती नानाबाई बारणे यांच्या पार्थिवावर गुरूवार दिनांक १९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता थेरगाव स्मशानभूमी, थेरगाव गावठाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group