पिंपरी (Pclive7.com):- पाठीमागे “व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी” कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजपात सामावून घेतलं. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण “भाऊ” जगताप यांना मी सांगितलं होतं. मी जातीवंत पैलवान आहे. भोसरीतल्या मातीशी निगडीत माणूस आहे. एकदा तुम्ही पाठीवर थाप मारली, आणि मी आखाड्यात उतरलो, तर एकालासुध्दा सोडणार नाही. म्हणुनच, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा एकसुध्दा नगरसेवक निवडून येऊ दिला नाही. विरोधकांना याच मातीत पहिल्याच डावात चितपट केले, अशा शब्दांत भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांनी शिरूरचे खासदार आढळराव पाटील यांच्यावर निशाना साधला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदावर हजारो लोकांच्या साक्षिने फोडण्यात आला. यावेळी आमदार लांडगे यांनी आपल्या कर्तृत्वाचा इतिहास उलघडून सांगितला. यावेळी मुख्यंत्र्यांसह भाजपचे मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या चार वर्षात तुम्ही काय केलं म्हणून बोंब मारली जात आहे. गुन्हेगारी वाढली, अमुक झालं-फलानं झालं, असे आरोप केले जात आहेत. आम्ही आता सत्तेत आलो आहोत, चार वर्षात आम्ही चालायला शिकलोत. गेल्या पंधरा वर्षात “तु” सत्तेत असताना काय दिवे लावले. आता सगळं काही व्यवस्थित चालू आहे, “भाऊं”च्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक व्यवस्थित काम करत आहेत. तरीही देखील आमच्यावर आरोप केले जात आहेत, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी माजी आमदार विलास लांडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर सडकून टिका केली.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती करण्यासंदर्भात बोललो होतो. युती केली असती तर खुर्च्या मिळाल्या असत्या. एका विचाराचे पक्ष एकत्र आले असते. एकदिलाने काम करता अाले असते. अशी कल्पना मांडली होती. दोन-चार नगरसेवक त्यांचे निवडून आले असते. परंतु, त्यांनी नाही ऐकलं. म्हणून आज त्यांच्यावर वाईट दिवस आले आहेत, असे सांगत पैलवान लांडगे यांनी खासदार आढळराव यांच्यावर डाव टाकला.






















Join Our Whatsapp Group