पवना धरणामध्ये महेश तारू यांनी जाळे लावले होते. ते काढण्यासाठी गेले असता जाळ्यात त्यांना दूर्मिळ तीन किलोचा गार प्रजातीचा अलिगेटर मासा दिसला. या माशाचे तोंड मगरी सारखे तीक्ष्ण, दात, जीभ, पाठीचा भाग तीव्र टणक, डोळे, नाकपुड्या आदी असल्याने सुरुवातीला ती मगर असल्याचे त्यांना वाटले. मात्र हा मासा त्यांनी निरखून पहिला असता हा वेगळाच व दूर्मिळ मासा असल्याने आणि हा आपल्या भागात मिळत नसल्याने त्यांनी उत्सुकतेपोटी घरी आणला.
पवना धरणात आढळलेला मासा हा अजून, लहान असल्याने त्यांची आणखी किती संख्या या धरणात आहे, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतात ही प्रजाती दुर्मिळ असून, २०१५ मध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणामध्ये या प्रजातीने धुमाकूळ माजवला होता. तर काही वर्षांपूर्वी हा मासा दादरमध्ये आढळण्याने या प्रजातीचे मासे अजून, असल्यास अन्य जलचरासाठी धोकादायक ठरू शकत असल्याने भारतीय जीवशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांनी येथे विशेष सर्वे केला होता. प्रामुख्याने हा मासा नॉर्थ अमेरिकामध्ये पहावयास मिळतो.






















Join Our Whatsapp Group