पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील अंकिता अशोक नगरकर आणि रत्ना पाटील या दोन मैत्रिणींनी वाहनांच्या आधुनिक इंडिकेटरचा शोध लावला आहे. शोध लावलेल्या वाहनाच्या छतावर असलेल्या आधुनिक इंडीकेटरचे त्यांनी पेटंटचे रजिस्टर केले आहे. अंकिताचे हे १० वे पेटंट आहे.

या आधुनिक इंडीकेटरचे फायदे सांगताना अंकिता म्हणाली कि, प्रचलित वाहनांना इंडीकेटर चार ठिकाणी लावलेले असतात. आम्ही शोधलेले इंडीकेटर हे गाडीच्या छतावर दोन्ही बाजूने एलईडी बल्बची पट्टीच्या स्वरुपात आहे. ज्या बाजुला वळायचे अाहे ती पट्टी ब्लिंक होत राहते.
शोधलेले आधुनिक इंडीकेटर हे वाहनांच्या छतावर बसवलेले असल्याने ट्रकसारख्या उंच वाहन चालकांना देखील स्पष्टपणे दिसून येते. या शोधामुळे अपघातात घट होईल. कंपनीने वाहनांना बसविलेल्या इंडीकेटर सोबतच हे छतावरचे इंडीकेटर देखील कार्य करेल. अल्प खर्चात व कमी वेळात हे इंडीकेटर बसविता येते. आरटीओ नियमानुसार पिवळा रंग व त्यावर असणाऱ्या प्लास्टिक कव्हरमुळे प्रकाशाची तीव्रता प्रमाणात आहे.
हा इंडीकेटर जगभरात वापरला जाण्याची शक्यता आहे
वाहन क्षेत्रात सततचे होणारे अपघात व त्यातून होणारे मृत्यू येणारे अपंगत्व हे संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर उपाययोजना करणे व त्या संबधीत संशोधन करणे हे कार्य शास्त्रज्ञ अविरतपणे करीत आहे. यात खारीचा वाटा उचलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यापूर्वी माझी स्टेपलरच्या संशोधनासह इतर ९ पेटंट रजिस्टर आहेत.






















Join Our Whatsapp Group