
पिंपरी (Pclive7.com):- डुडुळगाव येथील यशदा स्प्लेंडर पार्क परिसरात पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि.११ डिसेंबर रोजी उघडकीस आली. इमारतीतील पाण्याच्या टाकीत महिला पडल्याची माहिती मिळताच चोवीसावाडी आणि मोशी उपअग्निशमन केंद्रांची वाहने तत्काळ घटनास्थळी रवाना झाली.

घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांना टाकीत एक महिला पडलेली दिसली. रेस्क्यू हूक आणि दोर यांच्या सहाय्याने मदतकार्य राबवून महिलेला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. आशाबाई ढोणे (वय ४६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

अग्निशमन दलाने महिलेचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

























Join Our Whatsapp Group