पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज मागविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. आज शनिवार (दि.१३) पासून वाकड येथील पक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी दिली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहर पातळीवर महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजप सोबत युतीमध्ये लढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यासाठी आरपीआयमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार शनिवार (दि.१३) ते मंगळवार (दि.१६) पर्यंत वाकड येथील पक्ष कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

महापालिका निवडणूक लढण्यासाठी आरपीआय पक्ष सज्ज आहे. आम्ही भाजपसोबत महायुतीमध्ये लढणार आहे. त्यासाठी आम्ही १५ जागांची मागणी केली आहे. शहरातील विविध प्रभागातून इच्छुक असल्याने अर्ज मागवले आहेत.– कुणाल वाव्हळकर, शहराध्यक्ष, आरपीआय


























Join Our Whatsapp Group