रहाटणी (Pclive7.com):- लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त Shubham Chandrakant Nakhate Youth Foundation तर्फे आयोजित Rahatani Premier League Inter-Society Cricket Tournament या भव्य क्रीडा सोहळ्याची उत्साहात सुरुवात झाली. One League, One Rahatani या ब्रीदवाक्याअंतर्गत सुरू झालेल्या या लीगने रहाटणी परिसरातील क्रीडाप्रेमी तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे.

रहाटणीतील विविध सोसायट्यांमधील युवकांना एकत्र आणत एकात्मता, क्रीडासंस्कार आणि सकारात्मक स्पर्धात्मक भावना रुजवण्याच्या उद्देशाने ही लीग गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने दरवर्षी आयोजित केली जात आहे. यंदाच्या स्पर्धेलाही नागरिकांचा व खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून आला.

उद्घाटन सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती..
या क्रीडा सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी नवविकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वरजी शेडगे, माजी नगरसेविका सविताताई खुळे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, मार्गदर्शक बाळासाहेब नखाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सामाजिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते संजय भिसे, अनिल काटे, अरुण चाबुकस्वर, सुनील नखाते, अमोल नखाते, संदीप नखाते, विश्वनाथ नखाते, दीपक जाधव, सुभाष दराडे, दीपक नागरगोजे, दीपक मनेरे, रेखाताई काटे यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा स्पर्धेतून सामाजिक एकात्मतेचा संदेश..
रहाटणी प्रीमियर लीग केवळ क्रिकेट स्पर्धा नसून, तरुणाईला सकारात्मक दिशेने घडवणारा, व्यसनमुक्ती, शिस्त आणि संघभावना रुजवणारा सामाजिक उपक्रम असल्याचे यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या सामाजिक विचारांना क्रीडामाध्यमातून पुढे नेणारा हा उपक्रम रहाटणीतील क्रीडा संस्कृती अधिक बळकट करणारा ठरत आहे. रहाटणीतील युवकांना एकत्र आणणारी आणि परिसरातील सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारी ही स्पर्धा यशस्वी होवो, अशा शुभेच्छा यावेळी आयोजकांकडून व्यक्त करण्यात आल्या.
तरुणाईला सकारात्मक दिशेने नेण्याचा विचारलोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी समाजात एकात्मता, शिस्त आणि तरुणाईला सकारात्मक दिशेने नेण्याचा विचार दिला. त्या विचारांना पुढे नेत Rahatani Premier LeagueÀ’m माध्यमातून रहाटणीतील युवकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ही लीग केवळ क्रिकेट स्पर्धा नसून, क्रीडेतून संस्कार, संघभावना आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उपक्रम आहे. “One League, One Rahatani’ ही भावना अधिक दृढ व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.– चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक व संयोजक

























Join Our Whatsapp Group