
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. अर्बन स्ट्रीट कामामुळे पार्किंगसाठी जागा राहिली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. अधिकाऱ्यांची बुध्दी घास चरायला जाते का? असा सवाल करीत कर्ज, दायित्व विविध प्रश्नांवर नगरसेवक प्रमोद कुटे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पाच हजार कोटींच्या प्रकल्पाची माहिती मिळेपर्यंत अर्थसंकल्पाला मंजुरी देऊ नका, अशी मागणीही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यासाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना नगरसेवक कुटे यांनी शहरातील विविध प्रश्न सभागृहात मांडले. प्रमोद कुटे म्हणाले, १ हजार ३६ पाने काल रात्री व्हाटस अँपवर आले. अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन पुन्हा बोलण्याची संधी द्यावी. कामे कोणती सुरू आहेत, त्याची माहिती द्यावी. संपूर्ण शहरात पाण्याची गंभीर समस्या आहे. त्यासाठी फक्त २७ कोटी तरतूद ठेवली. अधिकची निधी ठेवावा.

दोन वेळा कचरा गाडी फिरवावी. नदी सुधारसाठी ८० कोटी तरतूद केली आहे. पवना नदीत एक मासा शिल्लक राहिला नाही. जीवसृष्टी वाचविणे काळाची गरज आहे. पाणी, हवा चांगली नाही. प्रदूषण वाढले आहे. अर्बन स्ट्रीट कामामुळे पार्किंगसाठी जागा राहिली नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. अधिकाऱ्यांची बुध्दी घास चरायला जाते का? कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हरित सेतूमधून स्टाॅम वाॅटरची लाईन टाकावी. पावसाळ्यात प्रभागातील सहा हजार कुटुंबे दरवर्षी पाण्याखाली जातात.

निगडीपर्यंत मेट्रो झाल्यानंतरही नागरिकांना स्टेशनला येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे. अप्पूघरची दैयनिय अवस्था असून त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. शहरातून तीन नद्या वाहतात. एकही बोट क्लब नाही. आकुर्डी रुग्णालयात एनआयसीयूचा कमतरता जाणवत आहे. वारकरी भवनसाठी पाच वर्षांत पंधरा वेळा बैठका झाल्या. पण, अर्थसंकल्पात भवनाचा उल्लेख नाही. भवन उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.

पीएमएवायच्या मालमत्तांवर सोलर उभारावेत. एकाही खासगी रुग्णालयात आयुष्यमान भारत कार्डचा वापर होत नाही. पाच हजार कोटींच्या देणीची माहिती द्यावी. पाच हजार कोटींच्या प्रोजेक्टची एकलाही माहिती नाही. कामांचे प्रेझेंटेशन दाखविणे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तोपर्यंत अर्थसंकल्पाला मंजुरी देऊ नका, अशी सूचनाही नगरसेवक कुटे यांनी केले.

Tags: Pramod kute





















Join Our Whatsapp Group