पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात दुपारच्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाच्या सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सकाळपासून कडक उन्हामुळे तापमानात वाढ झाली होती, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले आणि शहरातील विविध भागांत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली.

या अनपेक्षित पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेकांनी या पावसाचा आनंद घेतला, तर काही भागांत पावसामुळे वाहतूक थोड्या वेळासाठी विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही अशाच पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





















Join Our Whatsapp Group