
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेमधील तब्बल ५२ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.

आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२६ आणि २०२६-२७ च्या अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये बदल करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी केली जाणार आहे. चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रवीण जैन यांना तात्काळ प्रभावाने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















Join Our Whatsapp Group