आळंदी (Pclive7.com):- वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिरात आकर्षक फुलांची देखणी सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसर रंगीबेरंगी फुलांनी उजळून निघाला असून भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

झेंडू, अष्टर, गोंडा, राजा अशा विविध देशी-विदेशी फुलांचा वापर करून मंदिराची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या नक्षीदार रचनेमुळे मंदिराला अत्यंत मनोहारी रूप प्राप्त झाले आहे.

माऊलींचा मुखवटादेखील नव्या वस्त्रांसह आणि फुलांनी सजवण्यात आला असून तो अतिशय आकर्षक दिसत आहे. सकाळपासूनच हे सुंदर रूप पाहण्यासाठी भाविकांनी आळंदी नगरीत मोठी गर्दी केली आहे.

एकूणच, वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरणात आळंदी नगरी न्हाऊन निघाली असून माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.






















Join Our Whatsapp Group