पुणे (Pclive7.com):- तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्यांच्यात सकारात्माक सक्षमता निर्माण करण्यानची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्या १ जानेवारी रोजी विजयस्तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्न होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असून प्रतिबंधात्मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्येच भांडणे लागावीत हाच त्यांचा हेतू असतो, अशा शक्तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत आहे. प्रत्येेक नागरिक हा ‘पोलीस’ असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्यांना काही नकारात्मक बाबी आढळून आल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन पाटील यांनी केले.
प्रारंभी विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group