पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी येथील मॅक्सरूफ कॉर्पोरेशन कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात शनिवारी (दि.२३ मे) कंपनीतील ३९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले.

एप्रिल व मे महिन्यातील कडक उन्हाळा तसेच सुट्ट्यांच्या कालावधीत रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात होत असल्याने रक्तपेढ्यांकडून रक्तसाठ्याची कमतरता भासत असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मॅक्सरूफ कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर संजीव राय यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी भोसरी येथील संजीवनी रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबिराच्या आयोजनासाठी समन्वयक मनेश म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना रक्तपेढीच्या वतीने सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सामाजिक जाणीव जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.




















Join Our Whatsapp Group