पिंपरी (Pclive7.com):- आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इंधनाच्या किमतींमधील अनिश्चिततेमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. गेल्या १० दिवसांतील ही चौथी दरवाढ असून, यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. आज, २५ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.

या ताज्या दरवाढीत पेट्रोलच्या किमतीत २.६१ रुपये तर डिझेलच्या किमतीत २.७१ रुपये प्रति लीटरची मोठी वाढ करण्यात आली आहे.

एप्रिल २०२२ नंतरची सर्वात मोठी दरवाढ मालिका
गेल्या दोन वर्षांपासून देशात इंधनाचे दर जवळपास स्थिर होते. केवळ मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी पेट्रोल-डिझेल २ रुपयांनी स्वस्त करण्यात आले होते. मात्र, १६ मे रोजी अचानक ३ रुपयांची वाढ करून ही स्थिरता संपुष्टात आली. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत ४ वेळा किमती वाढवून सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. यापूर्वी २३ मे रोजीही पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले होते.

पिंपरी चिंचवड शहरातील नवे दर
पेट्रोल – १११.५५ रुपये
डिझेल – ९८.२२ रुपये




















Join Our Whatsapp Group