पिंपरी (Pclive7.com):- चिखली परिसरातील पिंगळे रोडवरील सत्संग भवनासमोर असलेला वीज फिडर (Feeder Box) तातडीने स्थलांतरित करून वाहतुकीतील अडथळा दूर करावा, अशी मागणी शिक्षण समिती सदस्य तथा नगरसेवक यश दत्ताकाका साने यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सत्संग भवनासमोर रस्त्याच्या कडेला उभारलेला वीज फिडर बॉक्स सध्या नागरिक आणि वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. सत्संग भवन परिसरात विविध कार्यक्रमांमुळे नागरिकांची व वाहनांची मोठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत रस्त्यालगत असलेल्या या फिडर बॉक्समुळे वाहनांना वळण घेताना अडचणी निर्माण होत असून वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे.

स्थानिक रहिवासी, वाहनचालक आणि सत्संग भवनात येणाऱ्या नागरिकांनी या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित वीज फिडर बॉक्स रस्त्यालगतच्या जागेवरून हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या जनहिताच्या प्रश्नाला प्राधान्य देत तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, अशी विनंती यश साने यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.




















Join Our Whatsapp Group