पुणे (Pclive7.com):- पुणे ते सोलापूर महामार्गावरुन थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपुल दुरुस्तीच्या कामाकरिता केडगाव चौफुला येथून ८ जुलै २०२६ रात्री १२ वाजेपर्यंत वळविण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत.

थेऊर फाटा ते लोणीकंदकडे जाणारी अवजड वाहतूक केडगाव-चौफुला-न्हावरे मार्गे तळगाव ढमढेरे, शिरुर या पर्यायी मार्गे वळविण्यात आली आहे, नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जितेंद्र डुडी यांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group