पिंपरी (Pclive7.com):- प्रॉपर्टीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची दगडी पाटा व लोखंडी कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सेल्वराज राजंगम (वय ५२ रा. पिंपळे गुरव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी पहाटे सुमारे रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर लेन नं.४, पिंपळे गुरव येथे ही घटना घडली. प्रॉपर्टीच्या वादातून आरोपी सेल्वराज राजंगम याने कन्नड बालकृष्ण पडाची यांच्यावर दगडी पाट्याने डोक्यात वार केला. त्यानंतर लोखंडी कोयत्याने गळा चिरून त्यांची हत्या केली आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय शेलार यांनी फिर्याद दिली असून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
























Join Our Whatsapp Group