पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जून २०२६ रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान विद्यानगर, चिंचवड येथील राहत्या घरी ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या मुलीने फिर्याद दिली असून, तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नागनाथ दत्तू कांबळे (वय ५४, रा. विद्यानगर, चिंचवड) याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी वैशाली नागनाथ कांबळे (वय ३५) हिचा गळा दाबून खून केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून, पिंपरी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.




















Join Our Whatsapp Group