पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक राहुल कलाटे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या जनकल्याण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय योजनांची माहिती, नोंदणी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला.

या शिबिरामध्ये आयुष्मान भारत (आभा) कार्ड, सिनियर सिटीझन कार्ड, एनसीएमसी (ST बससेवा) कार्ड, आधार कार्ड व मतदान कार्ड दुरुस्ती नोंदणी, SIR मॅपिंग, रेशन कार्ड संदर्भातील सेवा, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना, संजय गांधी योजना, श्रावणबाळ निराधार योजना, दिव्यांगांसाठी पीएमपीएमएल मोफत बस कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी/अधिवास प्रमाणपत्र तसेच पीसीएमसी अंतर्गत विविध योजनांची माहिती व नोंदणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच परिसरातील ड्रेनेज, पाणीपुरवठा, कचरा संकलन, रस्ते विकास यांसारख्या नागरी समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर संबंधित विभागांमार्फत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक राहुल कलाटे यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शासनाच्या कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.




















Join Our Whatsapp Group