पिंपरी (Pclive7.com):- खंडोबा माळ चौक ते दळवी नगर उड्डाणपूल (गणेश व्हिजन समोरील बाजू) येथे वाहनांवर होणारी टोइंग कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

सदर ठिकाणी महापालिकेने पूर्वी पे अँड पार्कसाठी पांढरे पट्टे मारले होते, परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर ती योजना लागू झाली नाही. सध्या तेथे पार्किंगसाठी मुबलक जागा असून वाहतूक कोंडी होत नाही. तरीही वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅनद्वारे कारवाई केली जात असल्याने नागरिक, व्यापारी आणि सोसायटी धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे आपचे शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले.

यावेळी भुमकर चौक ते लक्ष्मी चौक, हिंजवडी येथील वाहतूक समस्या संघटन मंत्री अजय सिंग यांनी तर देहू येथील परंडवाल चौक येथील वाहतूक समस्येवर युवा उपाध्यक्ष विजय चांडल यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष वैजनाथ शिरसाट, संघटन मंत्री अजय सिंग, कामगार आघाडी कार्याध्यक्ष लक्ष्मण माने, महिला आघाडीच्या शिल्पा फुलमाळी, युवा उपाध्यक्ष विजय चांडल आदी पदाधिकारी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group