आकुर्डी (Pclive7.com):- कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान स्पर्धेला नागरिक तसेच विविध सार्वजनिक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात विविध मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत तब्बल १२६ नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

या स्पर्धेत मंडळांच्या रक्तदानातील सहभागाच्या आधारे प्रथम क्रमांकाचे २५,००० रूपये रोख पारितोषिक भैरवनाथ मित्र मंडळ, आकुर्डी गाव यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे १५,००० रूपये रोख पारितोषिक तेज मित्र मंडळ, दत्तवाडी, तर तृतीय क्रमांकाचे ७,००० रूपये रोख पारितोषिक जगदंब प्रतिष्ठान यांनी मिळविले. रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी आयोजित लकी ड्रॉमध्ये एक ग्रॅम सोन्याच्या नाण्याचे विजेते रितेश गायकवाड, आकुर्डी, तर सायकलचे विजेते मयूर पवार, ताथवडे ठरले. या उपक्रमासाठी संजीवनी ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, उद्योजक अमित बाबर, आयुष निंबारकर, पायल ज्वेलर्स दत्तवाडी, आणि स्काय ब्लू हॉटेल यांनी प्रायोजक म्हणून मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे या सामाजिक उपक्रमाला मोठे पाठबळ मिळाले.

या कार्यक्रमास उद्योजक उमेशभाऊ चांदगुडे, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे, नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका शैलजाताई मोरे, उद्योजक अमित बाबर, कुणाल लांडगे, बाबू शेट्टी, रणजित सोलंकी, जालिंदर काळभोर, महेश काटे, नानासाहेब पिसाळ, नितीन काकडे, टाटा मोटर्स युनियनचे माजी कार्याध्यक्ष अशोक माने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इखलास सय्यद, रमेश भोरकर, अभिजित पिसाळ, शाहरुख शेख, जावेद पठाण, सूरज मोरे, शुभम वरकुड, अमोल जैस्वार, निलेश कदम, सनी गोडसे, समाधान, दाजी चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील मोरे यांनी केले.
नागरिक आणि विविध मंडळांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रक्तदानाचा हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला. १२६ रक्तदात्यांच्या सहभागातून ‘रक्तदान हेच खरे मानवतेचे दान’ हा मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचला. आपुलकी मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.


















Join Our Whatsapp Group