‘स्वाईन फ्लू’ने पावसाळ्याच्या दिवसात कहर केला होता. या आजाराने जानेवारी २०१८ ते जानेवारी २०१९ या दरम्यान ३४ रुग्णांचे बळी घेतले आहेत. स्वाईन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात मोफत लस उपलब्ध करुन दिली होती. तसेच, या आजाराने मृत्यू पडणाऱ्यांची संख्या जुलै ते ऑक्टोंबर महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात होती. शहरातील महापालिका व खासगी रुग्णालयात मोठ्या संख्येने बाधित रुग्ण दाखल झाले होते.
‘स्वाईन फ्लू’ने शहरात थैमान घातल्याने शहरभर भयावह परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र, पावसाळा कमी झाल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यापासून अद्यापर्यत बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली होती. यासाठी, महापालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील दीड महिन्यांत दोन बाधित रुग्ण आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, सद्यस्थितीत ‘स्वाईन फ्लू’चा फैलाव वाढणार नाही या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.






















Join Our Whatsapp Group