पिंपरी (Pclive7.com):- जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून प्रा. संजीवनी पांडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव प्रियंका छापवाले यांनी निवडीचे पत्र दिले आहे.
या निवडीबाबत बोलताना प्रा. संजीवनी पांडे म्हणाल्या की, सरकार तर्फे अनेक सरकारी योजना नागरिकांच्या हितासाठी उतरवल्या जातात. पण अनेक नागरिकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचत नाही. त्यामुळे त्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. मुद्रा बँक कर्ज योजनेबाबतही अशीच स्थिती सर्वेक्षणात दिसून आली. हे चित्र बदलण्यासाठी तसेच योजनांचा प्रचार प्रसार करुन योजना लोकांना माहिती व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मुद्रा बँक योजना समन्वय समिती गठित करण्याचे आदेश नियोजन विभागाने दिले. ही योजना शिशु, किशोर, तरुण अशा तीन स्तरांवर विभागली गेली आहे.
ह्या योजनेद्वारे नवोदित व्यावसायिकपासून प्रस्थापित व्यावसायिकांपर्यंत सर्वांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. लहान व्यावसायिकांना ह्याद्वारे ५० हजार रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रा. संजीवनी पांडे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group