पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार पार्थ अजित पवार यांनी आज सांगवीमध्ये साई चौकात जम्मू काश्मिर मधील सीआरएफच्या शाहिद जवानांना आज श्रद्धांजली वाहिली.
अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी सांगवीतील साई मंदिराच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त आरतीसाठी पार्थ यांना बोलावले होते. आरतीपूर्वी पार्थ यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक नवनाथ जगताप, नाना काटे, राजू मिसाळ, माजी नगरसेवक अतुल शितोळे, प्रसाद शेट्टी तसेच मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group