पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा वाढली आहे. निवडणुकीच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली असून नगरसचिव उल्हास जगताप यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. आज दि.२ रोजी दु.३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.
स्थायी सभापती पदासाठी शीतल शिंदे, संतोष लोंढे, झामाबाई बारणे, आरती चोंधे यांच्या नावाची चर्चा होती. आता नेमकी कुणाची वर्णी लागणार हे काही क्षणातच स्पष्ट होणार आहे. दरम्यान अद्याप कोणाच्याही नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नसल्यामुळे या निवडीची उत्कंठा वाढली आहे.