पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील आरक्षण क्र.१६६ येथे क्रिडांगणासाठी जागा आरक्षित असुन सदर ठिकाणी क्रिडासंकुल उभारुन त्यास महात्मा ज्योतिबा फुले क्रिडा संकुल असे नामकरण करण्याचा प्रस्ताव नगरसेवक संदिप वाघेरे यांनी ‘ग’ प्रभाग समितीमध्ये मंजूरीसाठी पाठवला होता. त्यानुसार जानेवारी २०१८ मध्ये हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला होता. नगरसेवक संदिप वाघेरे यांंच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळेच आज हे काम मार्गी लागत आहे.

संदिप वाघेरे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरीगाव येथील स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. त्यामुळे या स्मशानभुमीचे देखील नुतनीकरण करण्यात येणार आहे. आपण एका विशिष्ट संस्कृतीचे पाईक आहोत. आपल्या संस्कृतीत मृत्युलाही खुप मोठे स्थान आहे. येथे केवळ सांस्कृतिक नव्हे तर भावनिक नातेही असते. परंतु पिंपरी वाघेरे गावातील स्मशानभुमीची अवस्था शोककळे सारखीच झाली होती. मध्यंंतरी याठीकाणी अंत्यसंकाराच्या वेळी आवश्यक असलेली विद्युत व्यवस्था नाममात्र होती. नगरसेवक संदिप वाघेरे यांंनी येथे सौर ऊर्जेचे सोलर पॅनल स्वखर्चाने बसवुन दिले. तसेच आता या स्मशानभुमीचे आधुनिक नुतनीकरण करण्याचे काम ही त्यांच्याच पाठपुराव्यामुळे मार्गी लागत आहे. पिंपरीगाव येथील स्मशानभुमीप्रमाणेच शहरातील सर्वच स्मशानभुमींंची अवस्था अशीच झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच स्मशानभुमीमध्ये सौरदिवे बसवावेत, अशी मागणीही कार्यक्षम नगरसेवक संदिप वाघेरे यांंनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group