पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) खालापूर मधील महड गावातील वरद विनायकाचे दर्शन घेतले. वरद विनायक हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. त्याचबरोबर खासदार बारणे यांनी ज्येष्ठ निरुपणकार अाप्पासाहेब धर्माधिकारी यांचीही भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. दरम्यान, खासदार बारणे यांनी शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच मतदारांच्या भेटीगाठीचा दौरा सुरू केला आहे. शुक्रवारी अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील एकविरा देवीचे आणि देहू येथील संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन बारणे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.
त्यानंतर आज (शनिवारी) मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महड गावातील वरद विनायकाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख करून देणारे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. खोपोली मधील शिवजयंती मंडळाला देखील खासदार बारणे यांनी भेट दिली.






















Join Our Whatsapp Group