पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उद्या शुक्रवारी दि.२९ रोजी वडगाव मावळ येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी दिली.
मुंबई-पुणे हायवेजवळील भेगडे लॉन्स येथे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हा मेळावा होणार आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख (मावळ) गजाजन चिंचवडे उपस्थित राहणार आहेत.
मावळचे भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, पुणे जिल्हा प्रभारी गणेश भेगडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, आरपीआयचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मेळाव्याच्या संयोजनात पुढाकार घेतला आहे. महायुतीच्या या महामेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन गजानन चिंचवडे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group