भोसरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभेचे शिवसेना-भाजपा युतीचे उमेदार शिवाजीराव आढळराव पाटील विजयाचा ‘चौकार’ मारण्यासाठी यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यात भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याशी झालेल्या ‘दिलजमाई’मुळे आढळरावांचे ‘पारडे’ जड झाले आहे. प्रचारात महेश लांडगे सक्रीय झाले असून आज भोसरी गावठाणातील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून युतीच्या प्रचाराची सुरूवात करण्यात आली.

भोसरी गावठाणातील भैरवनाथ मंदिरामध्ये आरती करून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, तसेच भोसरी विधानसभेतील भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाठिंबा देत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
भोसरी गावठाणातून सुरू झालेली ही रॅली शितलबाग, दिघी रोड, आळंदी रोड, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती अशी काढण्यात आली.






















Join Our Whatsapp Group