पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादीच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे सौदागर (Pclive7.com):- विरोधी पक्षाप्रमाणे मी केवळ आश्वासने देणार नाही, परंतु तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर भविष्यात मावळ लोकसभा मतदार संघात जगातील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीज असतील. आणि जगाच्या नकाशावर मावळ मतदार संघ हे ‘विकासाचे मॉडल’ म्हणून ओळखले जाईल असे मत आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी व्यक्त केले.
रहाटणी प्रभाग क्र.२८ च्या वतीने पिंपळे सौदागर येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजच्या मंदिरात नारळ फोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी पक्ष महाआघाडीचे मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचारफेरी दरम्यान ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शितलताई काटे, कैलास कुंजीर, केंद्रीय पोलाद मंत्रालय सदस्य संदिप काटे, माजी नगरसेवक कैलास थोपटे, शंकर काटे, दिपक अंकुश,ज्ञानेश्वर हांडे, सुनिल काटे, युवराज काटे पाटील, चंद्रकांत जगताप, संदेश काटे पाटील, अॅड.अशोक काटे, उत्तम धनवटे,वस्ताद दामूअण्णा काटे,राम कुंजीर, तानाजी पांढरे, मुंजोबा उत्सव समिती अध्यक्ष सुरेश काटे, राजूशेठ कुटे, शामराव काटे, संतोष हांडे, गणेश कापसे, जयवंत बोडके, सुशील बनपट्टे, शहाजी काटे, तसेच मुंजोबा प्रतिष्ठानचे तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थ व विविध सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.
पिंपळे सौदागर मधील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही येथील ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांचे दर्शन घेवुन केली जाते. त्याचप्रमाणे पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ आज मंदिरात फोडण्यात आला. यावेळी पिंपळे सौदागर परिसरातील नागरीकांच्या घरोघरी जावून त्यांना पार्थ पवार यांचे पत्रके देवून घड्याळाला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करुन पार्थ पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
…तर मावळ मतदार संघ ‘विकासाचे मॉडल’ असेल – पार्थ पवार






















Join Our Whatsapp Group